प्रत्येक महिला एक स्वप्न घेऊन जगत असते. तिच्याकडे कौशल्य, असामान्य बुद्धिमत्ता, आणि स्वबळावर तिचे ध्येय गाठण्याची क्षमता असते. पण कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक परिस्थिती आणि इतर अनेक अडथळ्यांमुळे ती आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. अशा महिलांसाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत, जसे की छोटे छंद वर्ग, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स, आणि कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन. महिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमच्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे.
स्वप्न साफल्य संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक संस्थांना भेट देऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. अनाथ मुलांना शैक्षणिक मदत केली जाते. महिलांसाठी काही तरी करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे, पाठिंब्यामुळे आणि विश्वासामुळे आमची संस्था उभी राहिली आहे.
We believe every woman has potential, and we are committed to supporting them in achieving their goals and fulfilling their dreams. Our mission is to encourage, enable, and facilitate their active involvement in business, employment, learning, and community life.
This organization envisions a future where all women are treated equally. By harnessing their skills, knowledge, resources, and potential, we aim to empower women to create sustainable change for themselves, their families, and their communities. Our organization is taking a small but significant step to help women`s dreams take flight.
मी सौ. प्रतिमा विलास साईल. काही खास वैयक्तिक कारणांमुळे मला कॉर्पोरेट सेक्टरमधील नोकरी सोडावी लागली. समाजसेवेची आवड मला आधीपासूनच होती आणि समाजाचे देणे लागतो, ही भावना माझ्या मनात होती. म्हणून सुरुवातीला महिलांसाठी छोटे उपक्रम सुरु केले आणि मुलांसाठी फ्री क्लासेसचे आयोजन केले. हे उपक्रम चालू असताना इतर महिलाही माझ्यासोबत काम करण्यासाठी तयार झाल्या आणि अशा प्रकारे स्वप्न साफल्य संस्थेचा पाया रचला.
नवनवीन शोध लावण्याची सुंदर बुद्धी आणि ती योग्य रीतीने वापरण्याची शक्ती म्हणजे सरस्वती. बुद्धी नीट वापरून, कोणालाही न फसवता केलेला विकास म्हणजे महालक्ष्मी. सरस्वती आणि लक्ष्मी आल्यावर त्यांचे संरक्षण आणि सांभाळ करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती म्हणजे महाकाली. या तीनही शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये वास करतात. प्रत्येक स्त्री एक स्वप्न घेऊन जगत असते. तिला स्वतःच्या कर्तृत्वावर स्वावलंबी जीवन जगायचे असते, पण तिच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी तिला योग्य संधी मिळत नाही. अशा महिलांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी आमची संस्था विविध विषयांचे प्रशिक्षण देते.
प्रत्येक महिला एक स्वप्न घेऊन जगत असते. तिच्याकडे कौशल्य, असामान्य बुद्धिमत्ता, आणि स्वबळावर तिचे ध्येय गाठण्याची क्षमता असते. पण कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक परिस्थिती आणि इतर अनेक अडथळ्यांमुळे ती आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. अशा महिलांसाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत, जसे की छोटे छंद वर्ग, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स, आणि कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन. महिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमच्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे.
स्वप्न साफल्य संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक संस्थांना भेट देऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. अनाथ मुलांना शैक्षणिक मदत केली जाते. महिलांसाठी काही तरी करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे, पाठिंब्यामुळे आणि विश्वासामुळे आमची संस्था उभी राहिली आहे.
मी सौ. प्रतिमा विलास साईल. काही खास वैयक्तिक कारणांमुळे मला कॉर्पोरेट सेक्टरमधील नोकरी सोडावी लागली. समाजसेवेची आवड मला आधीपासूनच होती. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना माझ्या मनात होती. म्हणून सुरुवातीला महिलांसाठी छोटे उपक्रम सुरु केले आणि मुलांसाठी फ्री क्लासेसचे आयोजन केले. हे उपक्रम चालू असताना इतर महिलाही माझ्यासोबत काम करण्यासाठी तयार झाल्या आणि अशा प्रकारे स्वप्न साफल्य संस्थेचा पाया रचला.
Read More
नवनवीन शोध लावण्याची सुंदर बुद्धी आणि ती योग्य रीतीने वापरण्याची शक्ती म्हणजे सरस्वती. बुद्धी नीट वापरून, कोणालाही न फसवता केलेला विकास म्हणजे महालक्ष्मी. सरस्वती आणि लक्ष्मी आल्यावर त्यांचे संरक्षण आणि सांभाळ करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती म्हणजे महाकाली. या तीनही शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये वास करतात.
प्रत्येक स्त्री एक स्वप्न घेऊन जगत असते. तिला स्वतःच्या कर्तृत्वावर स्वावलंबी जीवन जगायचे असते, पण तिच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी तिला योग्य संधी मिळत नाही. अशा महिलांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी आमची संस्था विविध विषयांचे प्रशिक्षण देते.